शनिवार, ३० जून, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २९ जून २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २९ जून २०१८

* रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फिल्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी २५ जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

* ज्याच्याकडे उपग्रह बांधणीची क्षमता व तंत्रज्ञान नाही अशा देशाच्या वैज्ञानिकांना उपग्रह तयार करण्याचे विनामुल्य प्रशिक्षण देण्याचे भारताने ठरविले आहे.

* आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेंस्टमेंट बँकेची एआयआयबी तिसरी वार्षिक परिषद २५ व २६ जून रोजी मुंबईमध्ये पार पडली आहे. त्यात बँकेकडून भारताला ४५० कोटी डॉलरचे अर्थसहाय्य मिळाले आहेत.

* केंद्र सरकारने 'पासपोर्ट सेवा' या मोबाईल ऍपद्वारे आता देशाच्या कोणत्याही भागातून घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पासपोर्ट घरपोच मिळणार आहे.

* केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समाजात व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या संस्था, संघटना, व व्यक्ती यांचा सन्मान जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त २६ जून २०१८ रोजी पुरस्कृत केले गेले.

* अवकाशात सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या अमेरिकेतील महिला अवकाशयात्री पेगी व्हीटसन नासा या अवकाश संशोधन संस्थेतून १५ जून रोजी निवृत्त झाल्या.

* १७ ऑक्टोबर २०१८ पासून कॅनडामध्ये गांजाला कायदेशीर मान्यता मिळणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुण्ड्रो यांनीच घोषणा केली आहे.

* पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अहमद शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे.

* बर्कशायर हॅथवे, अमेझॉन, जे पी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे.

* डीएसके कर्जप्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या जागी ए. सी. राऊत यांच्याकडे बँकेचा कारभार सोपवण्यात आला आहे. मराठे यांचा पदभार काढण्यात आला आहे.

* जागतिक बँकेच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे तापमानवाढ आणि मान्सूनवर परिणाम होऊन देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी मध्ये २०५० पर्यंत २.८ टक्क्यांनी घटणार असून देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या जीवनमानात घट होणार आहे.

* जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

* 'अल कायदा' आणि आयसीस या दहशतवादी संघटनांच्या नव्या संघटनांना बेकायदा ठरवत केंद्र सरकारने प्रतिबंध लावले आहेत.

* स्टोकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सिपरी अहवालानुसार भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांनी गेल्या वर्षभरात अणवस्त्रांच्या संख्येत वाढ केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

* झी मराठी वाहिनीवरील होममिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालक आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. 

* टेनिसचा बादशहा व सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररला पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आलेला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.