सोमवार, ११ जून, २०१८

यूपीएससी शिवाय बनता येणार प्रशासकीय अधिकारी - १० जून २०१८

यूपीएससी शिवाय बनता येणार प्रशासकीय अधिकारी - १० जून २०१८

* सरकारी अधिकारी बनण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा [आयएएस] उत्तीर्ण झाला पाहिजे ही अनिवार्यता संपुष्टात आली आहे.

* नरेंद्र मोदी सरकारने आज एक दूरगामी निर्णय घेऊन लॅटरल एंट्री नावाच्या नव्या प्रयोगावर शिक्कामोर्तब केले. यामुळे खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दर्जेदार अधिकाऱ्यांनी सरकारी नोकरीचे दरवाजे खुले झाले आहेत.

* १० मंत्रालयासाठी संयुक्त सचिवांच्या महत्वपूर्ण पदासाठी मागविलेल्या अर्जासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली.

* यापूर्वी सरकारी उच्चाधिकारी बनण्यासाठी ब्रिटिशकाळात सुरु झालेली यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही अनिवार्यता होती. त्यामुळे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगणारे हजारो विद्यार्थी जीव तोडून यूपीएससी च्या मागे लागतात.

* या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे निकष अत्यंत क्लिष्ट असतात. त्यामुळे पहिल्या झटक्यात युपीएसीसी होणे ही बाब भलतीच अभिमानास्पद व प्रतिष्ठेची बनली होती. 

* पंतप्रधान कार्यालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने डिओटीपी लॅटरल एंट्रीचा मार्ग खुला करणारी अधिसूचना आज विस्तृतपणे जारी केली. यानुसार दहा मंत्रालयांच्या संयुक्त सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

* या निर्णयामुळे अर्थ, आर्थिक विभाग, कृषी, रस्ते वाहतूक, जहाजबांधणी, पर्यावरण नवीनतम ऊर्जा, मुलकी हवाई वाहतूक, वाणिज्य या विभागात अधिकाऱ्याची भरती केली जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.