बुधवार, १३ जून, २०१८

वनडे मध्ये सर्वाधिक २३२ धावा काढणारी अँमेलीया केर जगातील पहिली महिला क्रिकेटपटू - १४ जून २०१८

वनडे मध्ये सर्वाधिक २३२ धावा काढणारी अँमेलीया केर जगातील पहिली महिला क्रिकेटपटू - १४ जून २०१८

* न्यूझीलंडची अष्टपैलू क्रिकेटपटू अँमेलीया केरने बुधवारी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली. अवघ्या १७ व्या वर्षी अँमेलीयाने वन डेत द्विशतक ठोकले असून १४५ चेंडूत ३१ चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद २३२ धावा काढल्या.

* यानंतर अँमेलीयाने गोलंदाजीतही कमाल दाखवत आयर्लंडच्या ५ फलंदाजाना माघारी पाठवून संघाला सहज मिळवून दिला.

* पुरुष आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतक्या कमी वयात १७ वर्षे १४३ दिवसाची असताना द्विशतक ठोकणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

* महिला क्रिकेटमध्ये वनडेत सर्वाधीक धावा काढणारे फलंदाज - अँमेलीया केर २३२ धावा - आयर्लंड विरुद्ध १३ जून २०१८, बेलिंडा क्लार्क नाबाद २२९ धावा डेन्मार्क विरुद्ध १९९७, दीप्ती शर्मा १८८ धावा १५ मे २०१७ साली.

* ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने १९९७ साली डेन्मार्कविरुद्ध २२९ धावा केल्या होता. क्लार्क ही २०० धावा काढणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.