मंगळवार, १२ जून, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १५ जून २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १५ जून २०१८

* आसाममधील दिब्रुगढ रेल्वे स्टेशन मोफत वायफाय सेवा उपलब्द असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले आहे.

* महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, राजीव सातव, श्रीरंग बारणे, हिना गावित यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त केला आहे.

* अनिवासी भारतीय व्यक्तीने भारतामध्ये केलेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासामध्ये करायला हवी असे आदेश केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयाने दिले आहेत.

* जगप्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी शेफ अँथनी बोर्डेन यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले आहे.

* प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह वस्तूवर तामिळनाडू सरकारने पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

* रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रे यांनी एक करार केला आहे. यामुळे म्यानमारमधून पळून गेलेल्या ७ लाख रोहिंग्याना पुन्हा म्यानमारमध्ये आणण्याच्या योजनेला गती येण्याच्या शक्यता आहे.

* अरबी आणि उर्दू भाषांचे जाणकार आणि इस्लामी धर्मसाहित्याचे आणि त्यासोबत सुफी संतविचारांचे अभ्यासक प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी ३ जून रोजी निधन झाले.

* कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या दोन गोलमुळे भारताने केनियाला २-० ने पराभूत करून इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

* बुडीत कर्जासाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २०१७-१८ या वर्षात ८७,००० कोटींचा तोटा झाला आहे.

* युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स या संस्थेतील प्रा मार्टिन ग्रीन यांना प्रतिष्ठेचा जागतिक ऊर्जा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रकाशीय सौर विद्युतघटावर त्यांनी केलेले संशोधन महत्वाचे व क्रांतिकारी ठरले आहे.

* देशातील १८ क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या देशात असलेल्या ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांची संख्या ३८ वर येणार आहे.

* भारतीय नेत्र जैवभौतिकशास्त्रज्ञ डॉ आशिक महंमद यांना युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स, राउंड हाऊसच्या माजी विद्यार्थामधून २०१८ चा माजी विद्यार्थी संशोधक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

* सहा वेळा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघावर मात करत बांग्लादेशचे पहिलेच टी-२० आशिया चषक विजेतेपद ठरले.

* आसाममधील दिब्रुगढ रेल्वे स्टेशन मोफत वायफाय सेवा उपलब्द असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले आहे. 

* संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनातील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूर पाठोपाठ नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब होईल. असे संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.