गुरुवार, ७ जून, २०१८

आयआयटी मुंबई देशातील सर्वोत्कृष्ट संस्था - ७ जून २०१८

आयआयटी मुंबई देशातील सर्वोत्कृष्ट संस्था - ७ जून २०१८

* शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Quacquarelli Symonds [QS] या कंपनीने जगातील विद्यापीठांची रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील आयआयटी आणि आयआयएस या संस्था उत्कृष्ट ठरल्या आहेत. 

* पहिल्या २०० विद्यापीठांच्या यादीत आयआयटी मुंबई १६२ व्या स्थानावर, आयआयएस बंगळुरू १७० व्या स्थानावर आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी मुंबईने दिल्लीवर मात केली आहे. ही देशातील सर्वोत्कृष्ट संस्था बनली आहे. 

* आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीला पिछाडीवर सोडत १७ व्या स्थानाने वर उडी घेतल्याने ती देशातील सर्वात सर्वात अव्वल रँकची शैक्षणिक संस्था ठरली आहे.

* तर दुसरीकडे आयआयएस बंगळुरू या संस्थेनेही आयआयटी दिल्लीला मागे टाकले आहे. मात्र असे असले तरी टॉप १५० मध्ये या संस्थेला स्थान मिळवता आले नाही.

* यंदा आयआयटी दिल्लीने आपला क्रमांक कायम राखला आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबईने ४० व्या क्रमांकाने वर वर उडी घेतली आहे. याचा अर्थ भारतातील या उच्च शिक्षण संस्थेने सातत्याने आपली कामगिरी उंचावली आहे.

* आयआयएस बंगळुरू ही फॅकल्टीनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची संशोधन संस्था ठरली आहे.  तसेच आयआयटी रुरकी या संस्थेला १०० पैकी ८९.५ एवढे गूण देण्यात आले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.