सोमवार, ११ जून, २०१८

जागतिक आशा निर्देशांकात भारत ८४ व्या स्थानी - ९ जून २०१८

जागतिक आशा निर्देशांकात भारत ८४ व्या स्थानी - ९ जून २०१८

* एखाद्या देशाने सकारात्मक विचार करत विकासाची अथवा बदलाची आशा धरल्यास होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आशा निर्देशांक काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

* केवळ एखाद्याच क्षेत्रातील अभ्यासावरून क्रमवारी काढण्याऐवजी तुलनात्मक बदलांचा अभ्यास करून राहुल वासलेकर यांनी ही नवी यादी तयार केली आहे.

* जगभरातील १३१ देशामध्ये सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या या यादीत भारत ८४ व्या स्थानावर आहे. आशेमुळे एखाद्या देशाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत बदल घडून येतो का हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले.

* एखादी सकारात्मक गोष्ट घडावी, अशी अपेक्षा करणे म्हणजे अशा अशी सर्वसामान्य व्याख्या आहे. ही वैयक्तिक बाब असली तरी सर्वेक्षण करताना ती सामाजिक बाब म्हणून ध्यानात घेतली गेली.

* दहशतवाद, स्थलांतर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरात सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण होत असताना लोकांमध्ये आशेचा किरण कायम राहावा या उद्देशाने जागतिक आशा निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली आहे.

* आपत्तीमध्ये आशा कायम ठेवल्याने समाजामध्ये काय आणि किती बदल झाला. नागरिकांचे बदललेले जीवनमान आणि आर्थिक स्थिती याची छाननी या वेळी घेण्यात आली.

* तसेच, गेल्या काही वर्षातील सामाजिक व इतर बदल जागतिक बँकेसारख्या संस्थांनी गोळा केलेली माहिती यांचा अभ्यासही करण्यात आला.

* एखाद्या देशातील दीर्घकालीन अथवा अल्पकालीन बदलाचा किती प्रभाव पडतो. याचा अंदाज या निर्देशांकामुळे येतो.

* आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या बाबीपलीकडे राजकारण, संशोधन यांच्याकडे पाहण्याची गरज असली तरी या मूळ बाबीशिवाय देशाला कोणत्याही बाबतीत आशा ठेवता येणार नाही. असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

* जागतिक आशा निर्देशांकाच्या यादीतील प्रमुख देश - १] आयर्लंड, ७] सिंगापूर, १७] अमेरिका, २४] जपान, ४४] भूतान, ५३] चीन, ७५] श्रीलंका, ८४] भारत, १२७] पाकिस्तान. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.