गुरुवार, २८ जून, २०१८

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यला दुसरा क्रमांक - २५ जून २०१८

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यला दुसरा क्रमांक - २५ जून २०१८

* स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वच्छतेविषयीच्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक झारखंड तर तृतीय क्रमांक छत्तीसगढ राज्याने पटकाविला आहे.

* तर राजधानीचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशात मुंबई उपनगराला पहिला क्रमांक मिळाला असून घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईने बाजी मारली आहे.

* स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वचतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

* त्याअंतर्गत ४ जानेवारी २०१८ ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४,२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

* त्यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २१७ शहरांनी सहभाग घेतला होता. या सर्व विजेत्या शहरांचा गौरव इंदूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

* स्वच्छ भारत अभियान हा देशपातळीवर राबविला जाणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. २०१५ पासून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात देशभरातील शहरे, राज्यांच्या राजधानीची शहरे यांचा समावेश आहे.

* दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र अशा संस्थेमार्फत देशातील शहरांची विविध निकषाच्या आधारे तपासणी केली जाते.

* या सर्वेक्षणामध्ये विविध विभागातील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण १० पारितोषिके महाराष्ट्राला मिळाली आहेत.

* घनकचरा व्यवस्थापन, नगर नियोजन, दळणवळण, नियोजन, सांडपाणी व मलनिःस्सारण व्यवस्था हे घटक शहरांची तपासणी करताना गृहीत धरले जातात.

* स्वच्छ सर्वेक्षणामध्ये विविध विभागातील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण १० पारितोषिके महाराष्ट्राला मिळाली आहे.

* महाराष्ट्रातील २८ शहरांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळविले आहे. एक लाख लोकसांख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८ शहरांनी स्थान मिळविले आहे.

* राज्यातील ९ शहरांना [६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील ३ शहरांना विभागस्तरावर स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.

* एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या अमृत शहरे स्पर्धेत नवी मुंबईने नववा आणि पुण्याने दहावा क्रमांक मिळविला आहे.

* साईच्या शिर्डीने एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी शहरांच्या वर्गात देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

* नागपूर शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादामध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहरांचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर पुरस्कार मिळाला आहे.

* सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला. तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट या शहराला मिळाला आहे.

* पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.