गुरुवार, २८ जून, २०१८

सौदी अरेबियात पहिल्यांदाच महिलांना वाहन परवाना - २६ जून २०१८

सौदी अरेबियात पहिल्यांदाच महिलांना वाहन परवाना - २६ जून २०१८

* महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव देश अशी ओळख असलेल्या सौदी अरेबियात जवळपास १.५१ कोटी महिला पहिल्यांदाच रस्त्यावर वाहने चालवताना दिसणार आहेत.

* सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कायदे असून आतापर्यंत महिलांना वाहन चालवण्याची परवानगी नव्हती.

* तीन वर्षांपूर्वी या देशातील महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला होता. यानंतर महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

* २७ सप्टेंबरला २०१७ रोजी सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही महिलांवरील वाहन चालविण्यास असलेली बंदी उठविली होती. त्यानंतर महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन परवाना देण्यात आला होता.

* सौदी अरेबियातील महिलांना वाहन परवाना मिळत नसल्याने एक दशकाहून अधिक काळ सौदी अरेबियावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका केली जात होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.