बुधवार, १३ जून, २०१८

भय्यूजी महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या - १३ जून २०१८

भय्यूजी महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या - १३ जून २०१८

* अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज उर्फ उदय सिंह देशमुख वय ५० यांनी मंगळवारी निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव असलेल्या भय्यूजी महाराजांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत असे.

* त्यांनी आज दुपारी स्वतःच्या खोलीत उजव्या कानशिलाजवळ गोळी झाडून घेतली. आवाज ऐकताच पत्नीने दरवाजा ठोठावला. पण आतून आवाज न आल्याने दरवाजा तोडला असता ते जखमी अवस्थेत होते.

* मध्य प्रदेश सरकारने दोन महिन्यापूर्वी देऊ केलेला राज्यमंत्रिमंडळाचा दर्जा भय्यूजी महाराजांनी नाकारला होता. अण्णा हजारे यांना आंदोलन मागे घेण्यास सांगण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारने त्यांना दूत म्हणून पाठविले होते.

* भय्यूजी महाराजांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचे नोव्हेंबर २०१५ मध्ये निधन झाले. त्यांना कुहू नावाची मुलगी झाली. मागील पत्नीच्या निधनानंतर त्यांनी डॉ आयुशी शर्मा यांच्याशी विवाह केला.

* राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक तसेच करमणूक क्षेत्रातील मंडळींचा भय्यूजी महाराजांचा संबंध होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.