शनिवार, २३ जून, २०१८

आजपासून राज्यात प्लॅस्टिक बंदी - २३ जून २०१८

आजपासून राज्यात प्लॅस्टिक बंदी - २३ जून २०१८

* राज्यात आजपासून प्लॅस्टिक बंदीची कार्यवाही सुरु होणार असून यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिका नगरपालिकाचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तलाठी व ग्रामसेवकावर असेल. 

* येत्या तीन महिन्यात संपूर्ण राज्य प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. 

* बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू - प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ, थर्मोकॉल, ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने, साठविण्यासाठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे. 

* द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक व थर्मोकोलच्या सजावटीच्या वस्तू. 

* बंदी नसलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू - अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या, औषधांचे वेष्टन, कृषी क्षेत्रातील सामान साठविण्याचे प्लॅस्टिक, नर्सरीमध्ये वापरले जाणारे प्लॅस्टिक, अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या, ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लॅस्टिक, टिफिन डिस्पोजल बॅग, टीव्ही फ्रिज इत्यादी साठी वापरले जाणारे प्लॅस्टिक. 

* दंड - ५००० हजार रुपये एकदा नियम मोडल्यास, १०,००० रुपये दंड दुसऱ्यांदा नियम मोडल्यास, २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवास तिसऱ्यांदा नियम मोडल्यास. 

* उपाययोजना - महापालिका क्षेत्रात आरोग्य निरीक्षकाची नियुक्ती करणार, स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र यंत्रणा उभारणार. कचरा मुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य. 

* प्लॅस्टिकच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी मुंबईत ५० ठिकाणी यंत्रणा. याच धर्तीवर येत्या तीन महिन्यात राज्यभरात केंद्र उभारणार. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.