गुरुवार, ७ जून, २०१८

जगातल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूत विराट कोहलीचे स्थान - ६ जून २०१८

जगातल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूत विराट कोहलीचे स्थान - ६ जून २०१८

* जगप्रसिद्ध नियतकालिक फोर्ब्सने २०१८ तील जगभरातल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे. जाहीर झालेल्या टॉप १०० श्रीमंत खेळाडूच्या यादीत केवळ एकच भारतीय समावेश असल्याचे यावेळी दिसून आले.

* विशेष म्हणजे जाहीर झालेल्या यादीमध्ये एकाही महिला खेळाडूचा समावेश नसल्याचे पाहायला मिळाले.  टॉप १०० मध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचा समावेश असून तो यंदा ८३ व्या स्थानावर आहे.

* यापूर्वी जाहीर झालेल्या यादीमध्ये तो ८९ व्या क्रमांकावर होता. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार २०१८ मध्ये विराटची संपत्ती २४ मिलियन डॉलर एवढी आहे.

* या संपत्तीमध्ये त्याचे वेतन आणि अन्य कामकाजातून मिळालेल्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक श्रीमंत खेळाडूच्या यादीमध्ये ४० बास्केटबॉलपटूना समावेश असून यात १८ अमेरिकन फुटबॉलपटू आणि १४ बेसबॉलपटू आहेत.

* पहिल्या स्थानावर विराजमान होण्याचा मान मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर याने पटकावला आहे. २०१८ या वर्षातील त्याची कमाई १९१३ कोटी रुपये आहे.

* फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी ७४४ कोटी दुसऱ्या स्थानावर, ख्रिस्तियानो रोनाल्डो ७२४ कोटी तिसऱ्या स्थानावर, मिक्सड्स मार्शल आर्टस् खेळाडू कोनॉर मेकग्रोहार ६६३0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.