मंगळवार, ५ जून, २०१८

राज्य सरकारचे काही महत्वाचे निर्णय - ५ जून २०१८

राज्य सरकारचे काही महत्वाचे निर्णय - ५ जून २०१८

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आजच्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची उपस्थिती होती. 

[मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय]

* चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाजगी भागीदारी तत्वावर १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार. 

* एकात्मिक बाल विकासासाठी राज्यात २०१८-१९ पासून राष्ट्रीय पोषण मिशनची अंमलबजावणी करण्यास मान्यता त्यासाठी येणाऱ्या राज्य हिश्यास मंजुरी. 

* नागरी सुविधा देण्यासाठी राज्यातील कटक मंडळांना राज्य योजनेमधून निधी वितरित करण्याचा निर्णय. 

* मुंबई, नागपूर, आणि औरंगाबाद येथील विधी विद्यापीठांना प्रशासकीय व शैक्षणिक खर्चासाठी पुढील ५ वर्षाकरिता प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा ठोक निधी. 

* अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील उपाययोजनांना नवीन नावे देण्यासह योजनांमधील बाबीचे सुधारित दर लागू करण्यास मान्यता. 

* शासनाच्या महत्वाच्या प्रकल्पांना सुलभ आणि नियमित गौण खनिजांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र गौण खनिजांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन [विकास व विनियम] नियम - २०१३ मध्ये सुधारणा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.