शनिवार, ३० जून, २०१८

केंद्र सरकारची युजीसी आयोग बंद करण्याची घोषणा - ३० जून २०१८

केंद्र सरकारची युजीसी आयोग बंद करण्याची घोषणा - ३० जून २०१८

* केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशन युजीसी बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याजागी उच्च शिक्षण आयोग अर्थात हायर एजुकेशन कमिशन ऑफ ऑल इंडिया [HECI] ची स्थापना करण्यात येणार आहे. 

* नवा आयोग केवळ संशोधन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष देईल, विद्यापीठ किंवा महाविद्यालयांना अनुदान किंवा ग्रॅण्ट देण्याच काम मंत्रालयातून होणार आहे. 

* नवा विद्यापीठ आयोग बोगस संस्था आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाईही करू शकतो. त्यासाठी १९५१ चा युजीसी ऍक्ट संपुष्टात आणत नवा एचसीआय ऍक्ट २०१८ लागू करण्यात येणार आहे. 

* केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी याबाबतचा नोटिफिकेशन जारी केले. व सूचना व हरकती मागितल्या आहेत. 

[UGC बंद करण्याचा निर्णय का] 

* लालफितीच्या कारभारात अडकलेल्या आणि सुस्त झालेल्या उच्च शिक्षणाला मुक्त करण्यासाठी विविध समित्यांमार्फत यूजीसीच अवलोकन सुरु होत. प्रा यशपाल समिती नॅशनल नॉलेज कमिटी, आणि हरी गौतम समिती युजीसी रद्द करून एकच शिक्षण नियामक करण्याची शिफारस केली होती. 

* युजीसी केवळ ग्रांट जारी करण्यातच व्यस्त होती.  शिक्षण संस्थांची गुणवत्ता, संशोधन किंवा मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष होत असे. 

* मात्र आता नवा आयोग केवळ शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनावर लक्ष देईल. विद्यापीठांना ग्रांट देण्याचे काम आता मंत्रालयाकडून होईल.

[ नव्या आयोगाचे कार्ये ]

* अभ्यासक्रमांचा कार्यकाळ निश्चित करेल. 
* अध्यापन, मूल्यांकन, संशोधन, यावर लक्ष देईल. 
* स्वायत्त संस्थाना मान्यता देणारे/रद्द करण्याचा निर्णय 
* महत्वाच्या पदांच्या नियुक्त्या 
* फॅकल्टी किंवा शिक्षकांच्या, शैक्षणिक संस्थांच्या कामगिरीनुसार फी, इन्सेन्टिव्ह आणि ऍडमिशनवर नियंत्रण. 
* दरवर्षी उच्च शिक्षण संस्थांच्या कामगिरीतून मूल्यांकन. 
* नियमांचं पालन न करणाऱ्या शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करणे. 

[ नवा आयोग युजीसीपेक्षा वेगळा कसा ]

* नव्या आयोगाला अध्यापन, मुल्याकंन, संशोधन यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे. 

* याशिवाय बोगस संस्थांवर कारवाई करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये तीन  वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. 

* युजीसी केवळ बोगस संस्थांची यादी जाहीर करत असे, मात्र कोणतीही कारवाई करत नसे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.