गुरुवार, १४ जून, २०१८

भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा जनरल मोटर्सच्या सीएफओपदी - १४ जून २०१८

भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा जनरल मोटर्सच्या सीएफओपदी - १४ जून २०१८

* भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी [सीएफओ] नियुक्ती करण्यात आली.

* ३९ वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्सच्या कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्ष आहेत. त्या १ सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार सांभाळतील.

* मूळच्या चेन्नई येथील असणाऱ्या सूर्यदेवरा या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ मेरी बारा यांना रिपोट करतील.

* मेरी बारा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्या यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव असून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा कंपनीला मोठा फायदा मिळाला आहे.

* मेरी बारा २०१४ पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. दोन प्रमुख पदावर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिलीच कंपनी आहे. 

* दिव्या सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए करून अमेरिका गाठली.

* २००५ मध्ये त्या जनरल मोटर्सशी जुळल्या त्यांनी जनरल मोटर्सचे अनेक महत्वाचे व्यवहार चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.