शुक्रवार, २२ जून, २०१८

राष्ट्रीय ज्येष्ठांचा छळवणूक अहवाल २०१८ - २१ जून २०१८

राष्ट्रीय ज्येष्ठांचा छळवणूक अहवाल २०१८ - २१ जून २०१८

* भारतात एकूण लोकसंख्येच्या १०% संख्या ६० वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या नागरिकांची आहे. २००६ ते २०५० या वर्षात देशाची लोकसंख्या ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

* विशेष म्हणजे याच काळात ६० पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांच्या संख्येत तब्बल २७० टक्क्याने वाढ होणार आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठाना संख्येत तब्बल २७० टक्कयांनी वाढ होणार आहे.

* भारतीय संस्कृतीत ज्येष्ठाना कुटुंबात आदर व मानाचे स्थान दिले जाते. मात्र भुवनेश्वरमध्ये याउलट स्थिती असून जेथे ज्येष्ठांची सर्वाधिक अवहेलना करणारे शहर म्हणून याचे नाव पुढे आले आहे.

* राष्ट्रीय ज्येष्ठांचा छळवणूक अहवाल २०१८ असा अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. त्यात ही बाब नमूद झाली आहे.

* भारतात ज्येष्ठांना कशी वागणूक दिली जाते याबद्दल हेल्पेज इंडिया ने २०१७ मध्ये एक अभ्यास केला होता. यासाठी १९ शहरामध्ये सर्वे करण्यात आला होता. त्यात भुवनेश्वरचा क्रमांक सर्वात खालचा होता.

* अपमानास्पद वागणुकीमुळे घरातून पळून जाण्याची भावना तेथील ९० % वयोवृद्धांनी व्यक्त केली होती. शहरातील ८२ टक्के वृद्धांना आदर राखला जात नसल्याचे वाटते. असे अहवालात म्हटले आहे.

* २३ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा छळ होत असल्याचे सांगितले. २२ टक्के वृद्धांना मारहाण होते. तर २९ टक्के जणांनी शिवीगाळ होत असल्याची कबुली दिली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.