सोमवार, ११ जून, २०१८

राफेल नदालचे ११ वे फ्रेंच विजेतेपद - १० जून २०१८

राफेल नदालचे ११ वे फ्रेंच विजेतेपद - १० जून २०१८

* प्ले कोर्टवरील सम्राट बिरुद पुन्हा एकदा सत्यात उतरवत स्पेनच्या राफेल नदालने रविवारी अकराव्यांदा फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. नदालने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थीमचा ६-४, ६-३, ६-२ असा सहज पराभव केला.

* नदालचे कारकिर्दीतील हे १७ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. विशेष म्हणजे नदालने ११ व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना सर्व लढती जिंकल्या.

* क्ले कोर्टवर नदालला कोणीच आव्हानवीर नव्हता. मात्र याच कोर्टवर त्याला केवळ थीमकडूनच पराभव पत्करावा लागला होता.

* यावेळी मात्र थिम नदालला आव्हाहन देऊ शकला नाही. थीम प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता. त्याच्याकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा होती.

* तिसऱ्या सेटमध्ये चौथ्या गेमला बोटाच्या दुखापतीने दुर्लक्ष करत त्याने विजेतेपद मिळविले. या सेटमध्ये थीमने नदालला मॅच पॉइंट्ससाठी पाच वेळा झुंजवले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.