रविवार, १७ जून, २०१८

देशात मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलुपचा प्रयोग - १७ जून २०१८

देशात मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलुपचा प्रयोग - १७ जून २०१८

* मुंबई-पुणे मार्गावर राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी हायपरलुप प्रकल्पाचा पहिला प्रायोगिक ट्रक पुण्यात होणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक ट्रॅक होणार आहे. 

* पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण [पीएमआरडीए] कार्यक्षेत्रात हा ट्रॅक होणार असून यासाठी १५ किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

* व्हर्जिन हायपरलुप कंपनी लवकरच आपले अभियंते पुण्याला पाठविणार आहेत. या तंत्रज्ञानासाठी ७०% सामग्री आणि उपकरणे राज्यातच आहे.

* अमेरिकेतील नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलुप तंत्रज्ञानाची चाचणी सुरु असलेल्या ठिकाणाला फडणवीस यांनी भेट दिली. त्यांनी हायपरलुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांच्याशी चर्चा केली. 

* व्हर्जिन हायपरलुपचे संस्थापक अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.

* अत्यंत वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या हायपरलूपचा प्रकल्प अमेरिका भारत, रशिया, दुबई, या चार देशामध्ये राबविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

* त्यात पुण्याचा समावेश असून व्यवहार्यता अहवाल प्री-फिजिबिलिटी  रिपोर्ट करण्यापर्यंत पुण्याने आघाडी घेतली आहे.  हायपरलुपमुळे पुणे मुंबई अंतर अर्ध्या तासात पार करता येईल. 

* हायपरलुप पॉड रिक्षासारखे असतात. त्यात एका वेळी ५० जण बसू शकतात. त्यातून तो पॉड फायर केल्यानंतर ती ट्यूब अर्ध्या तासात पुण्याहून मुंबईला पोचेल.

* वेग - एक हजार किलोमीटर प्रतितास, खर्च अंदाजे ३ लाख ५० हजार कोटी. प्रवासी वाहतूक क्षमता - एका तासात १० हजार प्रवाशांची वाहतूक शक्य. प्रतिवर्षी एक लाख ५० हजार टन हरित वायूउत्सर्जन कमी होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.