शुक्रवार, २९ जून, २०१८

चंद्रपूर भारतातले क्लायमेट चेंज हॉटस्पॉट - २८ जून २०१८

चंद्रपूर भारतातले क्लायमेट चेंज हॉटस्पॉट - २८ जून २०१८

* जागतिक बँकेने गुरुवारी जगातील क्लायमेट टॉप टेन क्लायमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. यादीत चार देशातील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे.

* यामध्ये भारतातील दहामध्ये एकट्या विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश असून चंद्रपूर भारतातले क्लायमेट चेंज हॉटस्पॉट ठरले आहेत.

* वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूर जगातले प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्रदूषणाचा येथील जनजीवन यांच्यावरही फरक पडला आहे.

* या शहरात पाऊस अनियमित होतो यावर्षी विदर्भ सर्वाधिक तापला आहे. यातही चंद्रपूर जगातले सर्वाधिक शहर ठरले होते.

* आता जागतिक बँकेच्या क्लायमेट चेंजच्या टॉपटेन यादीत चंद्रपूरचे नाव भारतातील दहा जिल्ह्यामध्ये अग्रक्रमावर आहे. विदर्भातील चंद्रपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्याचाही समावेश आहे.

* सोबतच विदर्भाच्या सीमेवरील छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव व दुर्गसह आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद या जिल्ह्याचा यात समावेश आहे.

* पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशातील प्रत्येकी दहा जिल्हे क्लायमेट चेंजचे हॉटस्पॉट ठरले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.