शनिवार, ३० जून, २०१८

जीएसटीतून महाराष्ट्राला ५२ हजार कोटी रुपये प्राप्त - ३० जून २०१८

जीएसटीतून महाराष्ट्राला ५२ हजार कोटी रुपये प्राप्त - ३० जून २०१८

* जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण होत असतानाच गेल्या वर्षभरात सरकारची तिजोरी २८% अधिक कर उत्पन्नाने भरली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. पण जीएसटीपेक्षा व्हॅटमधून  मिळणारे अजून अधिक आहे.

* देशात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी कर लागू झाला. जीएसटी लागू झाल्यानंतरही पेट्रोल व डिझेलसह मद्य व अन्य १० वस्तूवरील व्हॅट कायम आहे. 

* वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढते असल्याने त्यावरील भरमसाठ व्हॅट राज्य सरकारला मिळाला आहे. हा व्हॅट व जीएसटी मिळून २०१७-१८ मध्ये राज्याच्या तिजोरीत १.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

* जीएसटी आल्यानंतर करमणूक कर, मनोरंजन कर, प्रवेश कर, ऊस खरेदी कर, व राज्य सरकार वसुली करीत असलेला केंद्रीय विक्री कर हे सर्व संपुष्टात आले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.