मंगळवार, ५ जून, २०१८

रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एम के जैन यांची नियुक्ती - ५ जून २०१८

रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एम के जैन यांची नियुक्ती - ५ जून २०१८

* रिझर्व्ह बँकेतील डेप्युटी गव्हर्नरपदी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* बँक क्षेत्रातून नियुक्त करण्यात येणाऱ्या पदाकरिता जैन यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर जैन हे पुढील तीन वर्षासाठी असतील.

* डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा हे जुलै २०१७ मध्ये निवृत्त झाल्यापासून चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्तच होते. त्यासाठीच्या भरतीची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यापासून सुरु होती.

* गेल्या महिन्यातच झालेल्या डेप्युटी गव्हर्नरपदाच्या मुलाखतीची प्रक्रियेत युको बँकेचे चरण सिंह, स्टेट बँकेचे बी श्रीराम व पी.  के. गुप्ता कृष्णन, केंद्रीय सचिव यदुवेंद्र माथूर, नीती आयोगाचे टी व्ही सोमनाथन आदी सहभागी झाले होते.

* रिझर्व्ह बँकेत सध्या विरल आचार्य, एन एस विश्वनाथन आणि पी. बी. कांगो हे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत. जैन हे आयडीबीआय बँकेत मार्च २०१७ पासून व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.