सोमवार, ४ जून, २०१८

राज्यात समृद्धी महामार्गालात बुलेट ट्रेनचा केंद्राचा व रेल्वेचा प्रस्ताव - ४ जून २०१८

राज्यात समृद्धी महामार्गालात बुलेट ट्रेनचा केंद्राचा व रेल्वेचा प्रस्ताव - ४ जून २०१८

* बहुचर्चित व बहुप्रतीक्षित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूनेच आता बुलेट ट्रेन धावण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाची तशी योजना असून यासाठी रेल्वेने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासोबत चर्चा केल्याचीही माहिती आहे.

* दोन्ही मंत्रालय मिळून या प्रकल्पावर काम करणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास दोन वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेसाठी केलेला हा पहिला एकत्रित प्रकल्प ठरेल.

* मात्र या प्रकल्पामध्ये भूसंपादन अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करतानाच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचाही विचार करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

* मुंबई मेट्रो व दिल्ली कोलकाता बुलेट ट्रेनसाठीच्या स्पेनच्या इन्को या सल्लागार कंपनीनेच नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा तांत्रिक अभ्यास पूर्ण केला असल्याची माहिती आहे.

* समृद्धी महामार्गासोबत या बुलेट ट्रेनसाठीही भूसंपादन करण्याचा विचार सुरु असून यासाठी एन्को कंपनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

* त्यांचा अहवाल सकारात्मक असल्याची माहिती रेल्वेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने हे वृत्त आयएनएसला दिले आहे. सध्या एन्को कंपनीने दिलेल्या अहवालावर रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून अभ्यास सुरु आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.