गुरुवार, ७ जून, २०१८

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ - ६ जून २०१८

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ - ६ जून २०१८

* अखेर तब्बल साडेचार वर्षांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने आरबीआय ज्या दरानं बँकांना वित्तपुरवठा करत त्या व्याजाचे दर किंवा रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्के केला आहे.

* बँका ज्या दरानं आपल्याकडे असलेला अतिरिक निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर त्यांना ६ टक्के व्याज मिळेल.

* एप्रिल महिन्यामध्येच दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. आजच्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस शिफारस केली होती.

* यामुळे परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे, यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली की बँका हा वाढीव बोजा ग्राहकाकडे सरकावतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.