गुरुवार, २८ जून, २०१८

प्रवीण तोगडियाकडून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना - २६ जून २०१८

प्रवीण तोगडियाकडून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना - २६ जून २०१८

* विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी २४ जून रोजी अहमदाबादमध्ये नवीन संघटनेची स्थापना केली आहे. 

* आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद असे या संघटेनचे नाव असून तोगडिया हे या संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी तोगडिया समर्थकांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर [हिंदू हि आगे] असे लिहिले होते.

* तसेच व्यासपीठावर भारत माता, गोमाता, गणपती आणि अशोक सिंघल यांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही विश्व हिंदू परिषदेची स्पर्धक संघटना असणार याचेच संकेत तिच्या नवी दिल्लीत झालेल्या स्थापना कार्यक्रमातून मिळाले आहे. 

* एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या निवडणुकांमध्ये हिमाचलप्रदेशचे माजी राज्यपाल विष्णू कोकजे हे संघटनेच्या हे या संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले होते.

* कोकजे यांनी तोगडियांचे समर्थक मानले जाणारे राघव रेड्डी यांचा पराभव केला होता. त्यामुळे तोगडिया नाराज झाले होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.