शुक्रवार, ८ जून, २०१८

जागतिक गुंतवणूक अहवाल २०१८ - ८ जून २०१८

जागतिक गुंतवणूक अहवाल २०१८ - ८ जून २०१८

* भारतात येणारी थेट परकीय गुंतवणूक [एफडीआय] गेल्या वर्षी घसरून ४० अब्ज डॉलरवर आली आहे. २०१६ मध्ये ती ४४ अब्ज डॉलर होती.

* संयुक्त राष्ट्राच्या व्यापारविषयक अहवालात ही माहिती देण्यात आली. संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेच्या यूएनसीटीडी च्या वतीने जारी करण्यात आलेल्या [जागतिक गुंतवणूक अहवाल २०१८] सादर करण्यात आला आहे.

* २०१७ मध्ये जागतिक थेट परकीय गुंतवणूक २३ टक्क्यांनी घसरून १.४३ लाख कोटीवर आली आहे. ती २०१६ मध्ये १.८७ लाख कोटी होती.

* यूएनसीटीडी चे महासचिव यांच्या मते एफडीआयवरील नकारात्मक दबाव आणि जागतिक मूल्य साखळीतील मंदी हे जागतिक पातळीवरील धोरणकारकासमोरील सर्वात मोठे चिंतेचे मुद्दे आहेत.

* विशेषतः विकसनशील देशात ही समस्या जास्त आहे.  अहवालात म्हटले आहे की भारतातील एफडीआय २०१६ मध्ये ४४ अब्ज डॉलर होता. 

* २०१७ मध्ये घसरून ४० अब्ज डॉलर झाला. भारतातून बाहेर जाणारा निधीचा प्रवाह मात्र दुपटीने वाढून ११ अब्ज डॉलर झाला आहे. भारतातील एफडीआय बहिर्प्रवाह दक्षिण आशियात एफडीआय म्हणून जातो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.