रविवार, ३ जून, २०१८

स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नी ५ चे यशस्वी प्रक्षेपण - ३ जून २०१८

स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नी ५ चे यशस्वी प्रक्षेपण - ३ जून २०१८

* ओडिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नी ५ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.  लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात.

* या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५ हजार किमी इतकी असून ते डॉ अब्दुल कलाम बेटावरून लॉन्च करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे.

* हे क्षेपणास्त्र जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ञानी दिलेल्या माहिती नुसार बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड ४ वरून आज सकाळी ९.४८ वाजता क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात आले.

* अग्नी ५ ही सहावी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्रे अपेक्षित अंतर गाठले. आतापर्यंतच्या अग्नी ५ च्या तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे.

* हे नेव्हिगेशन आणि दिशादर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानयुक्त आहे. हायस्पीड कॉम्पुटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअर रोबकास्टच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लॉन्चिंग झाले.

* पृथ्वी वायूमंडळात येताना क्षेपणास्त्राला भिडणाऱ्या हवेमुळे याचे तापमान ४००० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. यासाठी यात कार्बन कंपोजीट शिल्ड लावण्यात आली आहे.

* त्यामुळे आतील तापमान ५० डिग्रीपेक्षा कमी राहते. अग्नी ५ पहिली चाचणी १९ एप्रिल २०१२ दुसरी १५ सप्टेंबर २०१३, तिसरी ३१ जानेवारी २०१५ आणि चौथी चाचणी २६ डिसेंबर २०१६ रोजी झाले. पाचवे परीक्षण १८ जानेवारी २०१८ ला झाले होते. या सर्व पाच चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.