गुरुवार, १४ जून, २०१८

२०२६ सालच्या फुटबॉल विश्वचषकाचे अमेरिका, मेक्सिको, कॅनडात आयोजन - १४ जून २०१८

२०२६ सालच्या फुटबॉल विश्वचषकाचे अमेरिका, मेक्सिको, कॅनडात आयोजन - १४ जून २०१८

* फुटबॉलच्या २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांना संयुक्तपणे देण्याचा निर्णय बुधवारी फिफा च्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला आहे.

* फिफाच्या सदस्यांनी या तिन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे ५ व्यांदा मोरोक्कोत यजमानपदापासून वंचित राहावे लागणार आहे. तीन देशांची मिळून विश्वचषक फुटबॉलचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

* फिफाच्या बैठकीत उत्तर अमेरिकेच्या संयुक्त प्रस्तावाला १३४ मते मिळाली, तर मोरोक्कोच्या पारड्यात केवळ ६५ मते पडली. 

* त्याचबरोबर या स्पर्धेपासून विश्वचषक स्पर्धा ४८ देशांची घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.  त्यामुळे कतार येथे २०२२ मध्ये होणारी स्पर्धा ३२ संघाचीच असेल. 

* या स्पर्धेत एकूण ८० सामने होणार आहेत. यातील सर्वाधिक ६० सामने अमेरिकेत, तर कॅनडा, मेक्सिकोत प्रत्येकी १० सामने होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.