सोमवार, ४ जून, २०१८

देशात मुंबईकर सर्वाधिक कष्टाळू - ४ जून २०१८

देशात मुंबईकर सर्वाधिक कष्टाळू - ४ जून २०१८

* मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावते, असे म्हटले जाते या मायानगरीतील रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत वर्दळ पाहायला मिळते. ती निवांत अशी कधीच नसते. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.  

* अलीकडेच जगभरातील ७७ महानगरामध्ये एक सर्वे करण्यात आला. त्यात मुंबईकर खूप कष्टाळू आणि सर्वात जास्त तास काम करतात. असे नोंदविण्यात आले आहे. 

* स्विस बँक यूबीएस ने जगभरातील ७७ महानगरामध्ये सर्वेक्षण केले आहे. त्यात मुंबईतील लोक दरवर्षी ३३१४.७ तास काम करतात. आणि त्याची एकूण सरासरी १९८७ तास असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. 

* रोम आणि पॅरिस शहरातील लोकांपेक्षा मुंबईकर दुप्पट काम करतात हे यावरून स्पष्ट झाले आहे. रोममधील लोक १५८१ तास तर पॅरिसमधील लोक १६६२ तास काम करतात. 

* सर्वाधिक तास काम करूनही मुंबईकर कमाईच्या बाबतीत पिछाडीवर आहेत. त्याचे कारणही सर्वेक्षणात देण्यात आले आहे. 

* न्यूयॉर्कमधील कामगार तरुण ५४ तास काम करून आयफोन खरेदी करू शकतो.  तर मुंबईकराला आयफोन खरेदी करण्यासाठी ९१७ तास काम करावे लागते. 

* कामाचे तास आणि कमाईचा विचार केला तर जिनेव्हा, ज्युरींच, लक्झेम्बर्ग आघाडीवर आहे. तर मुंबई याबाबतीत ७६ व्या क्रमांकावर आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.