शनिवार, २३ जून, २०१८

रत्नाकर मतकरी यांना बालसाहित्य पुरस्कार २०१८ जाहीर - २३ जून २०१८

रत्नाकर मतकरी यांना बालसाहित्य पुरस्कार २०१८ जाहीर - २३ जून २०१८

* ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार २०१८ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर नवनाथ गोरे यांना अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

* साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षीच्या मुख्य पुरस्कारांव्यतिरिक्त २२ भारतीय भाषांमधील साहित्यिकांना बाल युवा, अनुवाद, महिला आदी गटातील पुरस्कार दिले जातात.

* प्रत्येकी ५० हजार रुपये रोख व ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  येत्या १४ नोव्हेंबरला बालदिनी या पुरस्काराचे वाटप करण्यात येणार आहे.

* मराठीतील बाल साहित्य पुरस्कार विजेत्यांची निवड सर्वश्री अनिल अवचट, बाबा भांड, व डॉ वसंत पाटणकर, यांच्या समितीने केली. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारासाठी नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.