रविवार, ३ जून, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ३ जुन २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ३ जुन २०१८

* एनएसडीएलच्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

* ग्लोबल फ्लाईट प्राइसिंग अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगातल्या सर्वात स्वस्त आंतरराष्ट्रीय हवाई सेवाप्रदात्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस दुसरा आणि इंडिगो इंडिया पाचवा या भारतीय कंपन्यांची जागा मिळवली.

* हिंदू समूहाच्या विधवा स्त्रीला पुनर्विवाह करण्याची अनुमती देणारा एक ऐतिहासिक विधेयक पाकिस्तानातल्या सिंध प्रांताच्या विधानसभेने मंजूर केला आहे.

* नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधी मुद्यांना हाताळण्यासाठी एका नव्या विभागाची स्थापना केली आहे.

* भारताचा युवा पर्वतारोही अर्जुन वाजपेयी २४ वर्ष समिट सिक्स मध्ये ८००० मीटरपेक्षा उंच असलेल्या सहा पर्वतशिखरांना सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे.

* कोलंबिया उत्तर अटलांटिक करार संघटना [NATO] मध्ये औपचारिकपणे सामील झाले आहे. आणि यासोबतच हा NATO मध्ये सामील झाले आहे. आणि सामील लॅटिन अमेरिकेमधील पहिला देश ठरला आहे.

* जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरामध्ये २५-२८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रथमच 'वैश्विक पवन शिखर परिषद' याचे आयोजन करण्यात आले आहे.

* तेलंगणा राज्य शासन शेतकऱ्यांसाठी एक नवी जीवन विमा योजना सुरु करणार आहे. जी १५ ऑगस्ट २०१८ पासून लागू केली जाणार आहे.

* युरोपीय संघाने २५ मे २०१८ पासून जरनल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन [GDPR] प्रभावी केले आहे. ज्याचे संघाच्या सर्व २८ देशामध्ये कार्यरत कंपन्यांना पालन करणे अनिवार्य असेल.

* केरळमध्ये ६५ एकर परिसरात जटायू अर्थ सेंटर या नावाने एकमेव असे रॉक थीम पार्क शिळा उद्यान उभारले जात आहे.  आणि या उद्यानात गरुड पक्ष्याला साकारलेले जगातले सर्वात मोठे शिल्प ठेवले गेले आहे.

* पोलंडची लेखिका ओल्गा टोकरझ्युक ह्यांना फिक्शन श्रेणीत प्रतिष्टीत मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१८ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.