सोमवार, १८ जून, २०१८

नीती आयोगाची चौथी बैठक दिल्लीत संपन्न - १७ जून २०१८

नीती आयोगाची चौथी बैठक दिल्लीत संपन्न - १७ जून २०१८

* नीती आयोगाच्या चौथ्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संप्पन्न झाली.

* या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या संबंधित काही प्रमुख मागण्या व प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

* राज्यातील ३५०० ग्रामीण हाटच्या नूतनीकरणासाठी, सुधारणांसाठी ऍग्रीमार्केट इन्फ्रा फंडमधून निधी देण्यात यावा. यातून शेतमालाची विक्री वाढेल आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल.

* आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत दुधासाठी एमएसपी निश्चित करण्यात यावी तसेच विशेष ग्राम योजनेअंतर्गत स्किम्ड दूध पावडर निर्यातीवर १०% प्रोत्साहन सबसिडी देण्यात यावी.

* महाराष्ट्राने शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून परिणामी सकल घरेलू उत्पादनाचा जीएसडिपी वृद्धिदर हा २०१४-१५ पासून ८.३ टक्क्यापर्यंत आला आहे.

* राज्य सरकारने शेती, पायाभूत सुविधेतील गुंतवणुकीशिवाय, संरक्षण, अंतरिक्ष, लॉजिस्टिक, फिनटेक, ऍनिमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स यासारख्या अनेक नवीन धोरणांना आकार दिला आहे.

* शेतीला शाश्वत सिंचन देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून १३,१६० गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत.

* प्रगत शैक्षणिक अभियानाअंतर्गत राज्यात ६६,४५८ शाळा डिजिटल झाल्या आहेत.

* नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग ७१० किमीचा उभारण्यात येणार असून तो २४ जिल्ह्याना जोडणार आहे. त्यातून कृषी प्रक्रिया आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अमाप संधी निर्माण होणार आहेत. ४६,३५९ रुपयांचा हा प्रकल्प आहे.

* मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरामध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत असून हे प्रकल्प ९२,२१६ कोटी रुपये एवढ्या रकमेचे आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.