शनिवार, ३० जून, २०१८

आयडीबीआय बँकेची ५१% हिस्सेदारी एलआयसीकडे - ३० जून २०१८

आयडीबीआय बँकेची ५१% हिस्सेदारी एलआयसीकडे - ३० जून २०१८

* सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा वाढविण्याचा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेतील ५१% पर्यंतचा हिस्सा विस्तारित करू देण्याच्या महामंडळाच्या प्रस्तावाला विमा नियमकाने शुक्रवारी मंजुरी दिली.

* भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची बैठक हैद्राबाद येथे झाली. या बैठकीत महामंडळाला हिस्सा वाढविण्याची परवानगी देण्यात आली.

* आयडीबीआय बँकेवर महामंडळाचे निम्म्याहून अधिक वर्चस्व येणार असले तरी बँकेच्या व्यवस्थापन मंडळात शिरकाव नसेल. असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले.

* वाढीव हिस्सा माध्यमातून महामंडळ बँकेत १३,००० कोटी रुपये गुंतवेल. या माध्यमातून महामंडळाचा मोठया हिश्श्यासह देशातील बँकिंग क्षेत्रातही शिरकाव होणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.