फ्लाईट्स कादंबरीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार - १२ जून २०१८
* पोलंडमधील साहित्य वर्तुळात मोठा दबदबा असलेल्या लेखिका ओल्गा टोकारझूक यांच्या [फ्लाईट्स] या कादंबरीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
* हा पुरस्कार मॅन बुकर पुरस्काराचाच एक भाग असून तो इंग्रजीत अनुवादित कादंबऱ्यांना देण्यात येतो. फ्लाईट्स या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर हे जेनिफर क्रॉफ्ट यांनी केले असून, या पुरस्काराची ५० हजार पौंडाची रक्कम दोघीना समान वाटली जाणार आहे.
* मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या ओल्गापहिल्या पोलिश लेखिका आहेत. १०० कादंबऱ्यांतून त्यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली.
* त्यांच्या फ्लाईट्स या कादंबरीला यापूर्वी पोलंडचा सर्वोच्च नाइके साहित्य पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जर्मन पोलिश इंटरनॅशनल ब्रिज पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
* त्यांनी वॉर्सा विद्यापीठातून मानसशात्रज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले असून त्यांच्या कादंबऱ्या, कविता प्रसिद्ध आहेत. ओल्गा यांची रुटा नावाची खासगी प्रकाशन कंपनी आहे. त्या द ग्रीन्स या पर्यावरणवादी राजकीय पक्षाच्या सदस्या असून डाव्या विचाराच्या आहेत.
* पोलंडमधील प्रचलित उजव्या राजकारणाच्या टीकाकार म्हणून दुसरीकडे त्या बदनामही आहेत. त्यांच्या मतांनी देशात एकाच खळबळ उडवली आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा