शुक्रवार, १ जून, २०१८

नंदन निलेकणी आपली अर्धी संपत्ती दान करणार - २ जून २०१८

नंदन निलेकणी आपली अर्धी संपत्ती दान करणार - २ जून २०१८

* इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन निलेकणी त्यांची पत्नी रोहिणी निलेकणी आणि इतर तीन वंशाच्या उद्योगपतींनी बिल गेट्स, त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स आणि वॉरन बफेट यांच्या दानयज्ञात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

* निलेकणी पती-पत्नी यांच्याशिवाय अनिल व अलीसन भुसरी, शमशीर, शबीना वायलील आणि बी. आर. शेट्टी व त्यांच्या पत्नी चंद्रकुमारी रघुराम शेट्टी ही उद्योगपती जोडपी गेट्स आणि बफेट यांच्या पुढाकारात सहभागी होणार आहेत.

* मागील वर्षभरात एकूण १४ उद्योगपती यात सहभागी झाले असून, यातील सहभागी अब्जाधीशांची संख्या आता १८३ झाली आहे. २०१० साली ४० अमेरिकी दानवीरासह हा पुढाकार घोषित करण्यात आला होता.

* आतापर्यंत २२ देशातील दानवीर अब्जाधीश त्यात सहभागी झाले आहेत. वॉरेन बफेट यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

* गेट्स बफेट पुढाकाराचे हे आठवे वर्ष आहे. कॅनडा, भारत, संयुक्त अरब अमिरात व अमेरिका यासह जगभरातील दानवीरांची त्यात हिरीहिरीने सहभागी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

* अब्जाधीशांनी आपली अर्धी संपत्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जगातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्याची त्यांची आस आहे. यंदाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.