शुक्रवार, २९ जून, २०१८

राज्याची फळबाग शेतीसाठी नवीन योजना - २८ जून २०१८

राज्याची फळबाग शेतीसाठी नवीन योजना - २८ जून २०१८

* राज्यातील ५ हेक्टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे फळबाग लागवडीची नवी योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. 

* राज्यातील फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढावे या हेतूने राज्य सरकारने ५ हेक्टरवरील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय घेतला. 

* काही दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या योजनेवर शेतकऱ्यांना तीन टप्प्यात अनुदान दिले जाणार असून त्यामध्ये पहिल्या वर्षी ५० टक्के तर दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अनुदान मिळणार आहे. 

* त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे ऑनलाईन करावे लागणार आहेत. या योजनेची सविस्तर माहिती लवकरच राज्य शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

* यानुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात येणार, कोकण विभागासाठी १० हेक्टरची अट, पश्चिम महाराष्ट्रासह अन्य विभागासाठी सहा हेक्टरची अट, पहिल्या वर्षासाठी २० हजार हेक्टर क्षेत्र, तीन वर्षात टप्प्याटप्प्यात सर्वच शेतकऱ्यांना मिळणार लाभ. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.