मंगळवार, १२ जून, २०१८

राज्यातील नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - ११ जून २०१८

राज्यातील नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - ११ जून २०१८

* शिक्षण विभागाचे वादग्रस्त प्रधानसचिव नंदकुमार यांची बदली करून त्यांच्या जागी मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* तर गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

* राज्याच्या उद्योग विभाग अतिरिक्त सचिव सुनील पोरवाल यांची बदली गृहविभागात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची बदली पर्यावरण विभागात प्रधानसचिव राजगोपाल देवरा यांची वित्त विभागात सुधारणा प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

* उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागातील अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली.

* आशिषकुमार सिंग यांची बदली परिवहन आणि बंदरे विभागात करण्यात आली आहे. ठाणे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त मनोज सूर्यवंशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक पदावर केली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.