शुक्रवार, २२ जून, २०१८

मंडलिक व योग इन्स्टिट्यूटला पंतप्रधान पुरस्कार जाहीर - २२ जून २०१८

मंडलिक व योग इन्स्टिट्यूटला पंतप्रधान पुरस्कार जाहीर - २२ जून २०१८

* नाशिकचे योगतज्ञ विश्वास मंडलिक व मुंबईतील योग इन्स्टिट्यूट या संस्थेला योगविद्येचा प्रसार व विकासात भरीव कामगिरीबाबत यंदाचे पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाले.

* २१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी देशभरातून विविध गटातून १८६ नामांकने प्राप्त झाली.

* आयुष मंत्रालयाने सांगितले की प्राचीन अभ्यास करून विश्वास मंडलिक यांनी पतंजली व हटयोगाचे उत्तम ज्ञान मिळवले. १९७८ साली योग धाम विद्या या संस्थेची पहिली शाखा त्यांनी सुरु केली.

* आता या संस्थेच्या देशात १६० शाखा आहेत. त्यानंतर योगविद्या शिकविण्यासाठी मंडलिक यांनी १९८३ साली योग्य विद्या गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली.

* योगविद्येवर त्यांनी ४२ पुस्तके लिहिली या विषयाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ३०० सीडी त्यांनी तयार केल्या.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.