शनिवार, २३ जून, २०१८

देशात स्वच्छतेच्या बाबतीत झारखंड राज्य प्रथम क्रमांकावर - २३ जून २०१८

देशात स्वच्छतेच्या बाबतीत झारखंड राज्य प्रथम क्रमांकावर - २३ जून २०१८

* स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यामध्ये झारखंडने बाजी मारली असून ते देशातील पहिले राज्य ठरले आहे.

* निवड झालेल्या शहरांचा गौरव इंदूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  स्वच्छ भारत अभियान हा देशपातळीवर राबविला जाणारा पंतप्रधान मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

* २०१५ पासून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात देशभरातील शहरे यांचा समावेश आहे. दर वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र अशा संस्थेमार्फत देशातील शहरांची विविध निकषांच्या आधारे तपासणीच्या आधारे गुण दिले जातात.

* या गुणांच्या आधारे मानांकन आणि क्रमांक काढले जातात. यावेळी सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलेली कार्वे या कंपनीने देशपातळीवर शहरांचे मानांकन केले आहे.

* घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व मलनिःस्सारण व्यवस्था, नगर नियोजन, आदी घटक शहरांची तपासणी करताना गृहीत धरले जातात. या निकषाच्या आधारे निवड झालेल्या शहरामध्ये राज्यातील नऊ शहरांचा समावेश आहे.

* नागपूर, नवी मुंबई, भिवंडी, भुसावळ, पाचगणी, सेन्द्रा, रांजणगाव, सासवड, या शहरांचा समावेश आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.