शुक्रवार, २२ जून, २०१८

राष्ट्रीय संगीत नाटक पुरस्कार जाहीर - २१ जून २०१८

राष्ट्रीय संगीत नाटक पुरस्कार जाहीर - २१ जून २०१८

* संगीत नाटक अकादमीतर्फे कला क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी नाट्यलेखनासाठी अभिराम भडमकर व लोककलांचे अभ्यासक डॉ प्रकाश खांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

* अकादमीच्या २०१७ या वर्षातील पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कलावंताची निवड झाली आहे.  प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे व गायक आदित्य खांदवे यांना भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* संगीत नाटक अकादमीच्या वतीने १९५२ पासून कलाक्षेत्रातील सर्वोच्च योगदानाबद्दल सन्मान दिले जातात. प्रत्येकी एक लाख रुपये रोख ताम्रपट व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

* यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये तबलावादक योगेश समसी, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ललिता राव यांच्यासह गुंदेचा बंधू आदींचाही समावेश आहे. भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, डॉ खंडांगे ज्येष्ठ नृत्यांगना डॉ संध्या पुरेचा आणि समसी या महाराष्ट्रातील कलाकारांना अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.