बुधवार, २० जून, २०१८

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू - २० जून २०१८

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू - २० जून २०१८

* जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करायला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

* जम्मू काश्मीरमध्ये भाजपा पीडीपी आघाडीचे सरकार होते. पण भाजपने मंगळवारी पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळले.

* राज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पीडीपीला पाठिंबा न दिल्याने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

* त्यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याची स्थिती नसल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी अशा शिफारशींचा अहवाल जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठविला होता.

* मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल राजवट एन एन वोहरा यांनी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली आहे.

* मात्र कोणीही पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा न दर्शविल्याने अखेर राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठऊन दिला.

* यामध्ये त्यांनी राज्यघटनेच्या कलम ९२ अन्वये जम्मू आणि काश्मीर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.



0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.