शनिवार, २ जून, २०१८

मोदींचा सिंगापूर दौऱ्यात विविध करार - २ जून २०१८

मोदींचा सिंगापूर दौऱ्यात विविध करार - २ जून २०१८

* द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि संरक्षण संबंध  वाढविण्याबाबत भारत आणि सिंगापूर यांच्यात एकमत झाले आहे. या दोन देशामध्ये आज विविध आठ करारही करण्यात आले.

* सिंगापूर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्यात विविध मुद्यावर चर्चा झाली.

* भारत-प्रशांत महासागर भागात व्यापारासाठी शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

* कठीण परिस्थितीतही भारत आणि सिंगापूरमधील संबंध टिकून राहिल्याचे मोदी यांनी सांगितले. दोन देशामधील आर्थिक सहकार्य कराराचा दुसऱ्यांदा आढावा घेतला असला तरीही या करारात लवकरच सुधारणा केली जाईल.

* २००४ मध्ये हा करार सर्वप्रथम झाल्यानंतर दोन देशामधील व्यापार तुटीने वाढला आहे. सायबर सुरक्षितता क्षेत्रातही सहकार्याची आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले.

* विविध प्रकल्पासाठी भारतीय राज्ये सिंगापूरमधील कंपन्यांचे सहकार्य घेत लुंग यांनी समाधान व आनंद व्यक्त केला.

* आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती सिंगापूरमधील कंपनीच्या मदतीने साकारली जात आहे. तर पुण्यातील विमानतळाचा प्रवास विकास करण्यासाठीही महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.