मंगळवार, १९ जून, २०१८

ऑडीचे प्रमुख स्टॅडलर यांना अटक - १८ जून २०१८

ऑडीचे प्रमुख स्टॅडलर यांना अटक - १८ जून २०१८

* डिझेल मोटारीच्या प्रदूषण चाचणीत फेरफारप्रकरणी फोक्सवॅगन ची पालक कंपनी असलेल्या ऑडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुपर्ट स्टॅडलर यांना आज अटक करण्यात आली.

* या प्रकरणाशी संबंधित पुरावे स्टॅडलर यांच्याकडून नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याने ही कारवाई केल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.

* २०१५ मध्ये सर्वप्रथम कंपनीच्या डिझेल मोटारीमध्ये प्रदूषण चाचणीत चकमा देणारे सॉफ्टवेअर आढळून आले होते. कंपनीने याची कबुली दिली असून, या फसवणुकीप्रकरणी म्यूनिचमधील अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात स्टॅडलर यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता.

* युरोपमधील ग्राहकांना सदर सॉफ्टवेअर बसविलेल्या मोटारींच्या विक्रीसंदर्भातील कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप स्टॅडलर यांच्यावर आहे.

* स्टॅडलर यांना अटक केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात होणार का हे याप्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार असून. या कारवाईला कंपनीनेही दुजोरा दिला आहे. दरम्यान याप्रकरणी कंपनीचे २० अधिकरी तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.