बुधवार, १३ जून, २०१८

९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन - १३ जून २०१८

९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन - १३ जून २०१८

* अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास उद्यापासून मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्य मंदिराच्या प्रियदर्शिनी क्रीडा संकुलात सुरुवात होणार आहे. हे ९८ वे संमेलन असून ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते सायंकाळी साडेसहा वाजता तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन होईल.

* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद शिक्षणमंत्री विनोद तावडे भूषविणार आहेत. 

* शुक्रवारी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात आणि संमेलनाच्या समारोप सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.