शनिवार, १६ जून, २०१८

गौरी लंकेश यांच्या हत्येकरांना अटक - १६ जून २०१८

गौरी लंकेश यांच्या हत्येकरांना अटक - १६ जून २०१८

* पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील अटक झालेला सहावा संशयित परशुराम वाघमारे यानेच त्यांची हत्या केल्याचा दावा तपास पथकाने एसआयटीने आज केला आहे.

* तसेच गौरी लंकेश कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कन्नड साहित्यीक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तूल वापरल्याचेही स्पष्ट झाले.

* एआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.  वाघमारे यानेच गौरी लंकेश यांच्यावर गोळीबार केला आणि याच पिस्तुलातून पानसरे आणि कलबुर्गी यांनाही गोळ्या मारण्यात आल्याचे न्यायवैद्यक चाचणीतून स्पष्ट झाले.

* तसेच हे पिस्तूल मात्र अद्याप पोलिसांच्या हातात लागले नसल्याचे त्यांनी सांगितले. गोळीवरील खुणांवरून तपास करता येतो.

* उजव्या विचारसणीच्या एका हिंदू गटाशी या हत्यांचा संबंध असून त्याचे साठ सदस्य असावेत या गटात नाव नाही. त्याचे सदस्य असावेत. या गटाला नाव नाही.

* मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, आणि कर्नाटक या राज्यात या गटाचे सदस्य पसरलेले आहेत. उत्तर प्रदेशपर्यंत अद्याप या गटाचे धागेदोरे आढळून आले नाहीत.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.