शुक्रवार, १५ जून, २०१८

राज्यात आता समूह विद्यापीठ कायदा - १५ जून २०१८

राज्यात आता समूह विद्यापीठ कायदा - १५ जून २०१८

* राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच सरकारी विद्यापीठावर वाढलेल्या संलग्न महाविद्यालयांचा भर हलका करण्यासाठी राज्य सरकार समूह विद्यापीठ कायदा आणणार आहे.

* यामध्ये मोठा विस्तार असणाऱ्या अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयानाही क्लस्टर युनिव्हर्सिटी होण्याचा पर्याय उपलब्द होईल.

* राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान रुसा अंतर्गत तीन सरकारी महाविद्यालयांना समूह विद्यापीठ करण्यास मान्यता मिळाली आहे.

* परंतु त्यासाठी या विद्यापीठाचा कायदा करावा लागेल. यामुळे शिक्षण संस्थांची चार वा पाच महाविद्यालये असल्यास त्यांना क्लस्टर युनिव्हर्सिटीचा लाभ मिळेल.

* अनुदानित महाविद्यालयांचे विद्यापीठ झाले तरी त्यांचा निधी सुरूच राहणार असल्याने संस्थांना प्रोत्साहन मिळेल. शिक्षण संस्थांच्या दोन वेगळ्या संस्था एकत्र आल्या तरी त्यांनी समूह विद्यापीठ स्थापन करता येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.