गुरुवार, १४ जून, २०१८

आजपासून २१ वा फिफा विश्वचषकाची रशियात सुरुवात - १४ जून २०१८

आजपासून २१ वा फिफा विश्वचषकाची रशियात सुरुवात - १४ जून २०१८ 

* रशियात आयोजित एकविसाव्या फिफा विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर ४ वर्षांनी येणारी खेळांच्या दुनियेची जणू दिवाळी सुरु होत आहे. 

* फुटबॉल विश्वचषकाचा हा सण तब्बल ३३ दिवस चालणार असून या कालावधीत ३२ संघ आणि ६४ सामन्यांमध्ये मिळून सर्वोत्तम दर्जाचा फुटबॉल पाहायला मिळेल. 

* ब्लाडिनीर पुतिनचा रशिया २१ व्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनासाठी सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर ४ वर्षांनी साजरी होणारी अवघ्या जगाची दिवाळी होय.

* सन २०१८ सालीही फिफाच्या क्रमवारीत भारत ९७ व्या स्थानावर आहे. आपल्यासाठी आजही क्रिकेट हाच धर्म आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.