बुधवार, १३ जून, २०१८

किम जोंग आणि डोनाल्ट ट्रम्प यांच्यात शांततेसाठी चर्चा - १३ जून २०१८

किम जोंग आणि डोनाल्ट ट्रम्प यांच्यात शांततेसाठी चर्चा - १३ जून २०१८

* अमेरिकेवर अणवस्त्रांना मारा करण्याचे ध्येय असलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीत कोरियाची किनारपट्टी अणवस्त्रमुक्त करण्याचे आश्वासन दिले.

* डोनाल्ट ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात आज सिंगापूरमध्ये बहुचर्चित आणि ऐतिहासिक भेट झाली. सुमारे ५० मिनिटे झालेल्या या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांची अमेरिका उत्तर कोरिया दरम्यान शांततातेवर आधारित संबंध सुरु करण्यासंबंधी सविस्तर चर्चा केली.

* कोरियाची किनारपट्टी अणवस्त्रमुक्त करण्याचा निश्चय किम यांनी बोलून दाखविताच त्याबदल्यात उत्तर कोरियाला संपूर्ण सुरक्षा पुरविण्याची हमी ट्रम्प यांनी दिली.

* ट्रम्प-किम यांच्यात सुरवातीला चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळासह पुन्हा बैठक झाली. त्यात काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या.

* त्यानंतर बैठकीत ठरलेल्या मुद्यांची नोंद असलेल्या कागदपत्रावर सह्या करण्यात आल्या. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या अध्यक्षामध्ये थेट भेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.