मंगळवार, १२ जून, २०१८

राज्यातील विविध मंडळाच्या नियुक्त्या जाहीर - ११ जून २०१८

राज्यातील विविध मंडळाच्या नियुक्त्या जाहीर - ११ जून २०१८

* गेली साडेतीन वर्ष रखडलेल्या महामंडळावरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख संचेती तर, पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्षपदी आमदार डॉ सुनील पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

* पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.