सोमवार, ११ जून, २०१८

एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलँड महिला संघाचा सर्वाधिक धावांचा विक्रम - ९ जून २०१८

एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलँड महिला संघाचा सर्वाधिक धावांचा विक्रम - ९ जून २०१८

* न्यूझीलँड महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यात आयर्लंड विरुद्ध खेळताना ५० षटकांमध्ये ४ गडी गमावून सर्वाधिक ४९० धावांचा विक्रम केला.

* एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. न्यूझीलँडच्या महिला क्रिकेट संघाने त्यांच्याच संघाचा ४५५ धावांचा यापूर्वीचा विक्रमही या खेळीमुळे मोडला.

* यापूर्वी १९९७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँडच्या महिला संघाने ५ गडी गमावून ४५५ धावा केल्या होत्या.

* कर्णधार सुझी बॅट्स ९४ चेंडूत १५१ धावा, फलंदाज मॅडी ग्रीन, ७७ चेंडूत १२१ धावा, जेस वॅटकिन ५९ चेंडूत ६२ धावा, अमेला केर ४५ चेंडूत ८१ धावा यांच्या खेळीमुळे हि धावसंख्या कामगिरी करण्यात आली आहे.

* इंग्लंडच्या पुरुषांच्या संघाने २०१६ मध्ये पाकिस्तानविरोधात ४४४ धावा केल्या होत्या तो विक्रमही या महिलांनी मोडून काढला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.