सोमवार, ११ जून, २०१८

भारतात माता मृत्यूचे प्रमाण ७७ टक्क्यांनी घटले - १० जून २०१८

भारतात माता मृत्यूचे प्रमाण ७७ टक्क्यांनी घटले - १० जून २०१८

* प्रसूतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूच्या प्रमाणात घट घडवून आणल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने [WHO] भारत सरकारची स्तुती केली आहे. भारताने हे प्रमाण ७७ टक्क्यांनी घटवून दाखविले आहे.

* १९९० मध्ये हे प्रमाण एक लाख प्रसूतीमध्ये ५५६ एवढे होते तेच २०१६ मध्ये १३० वर आले आहे. यावरून चिरंतन विकास ध्येय गाठण्याच्या मार्गावर भारताची वेगाने वाटचाल सुरु असल्याचे दिसून येते.

* २०३० पर्यंत माता मृत्यूचे प्रमाण ७० टक्क्याच्याही खाली आणण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. सध्या भारत हा जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या दीर्घकालीन विकास ध्येयापासून कोसो दूर आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या संचालक पूनम क्षेत्रपाल सिंह म्हणाल्या की मातांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यामध्ये भारताने मोठी आघाडी घेतली असून हे प्रमाण दुप्पट झाले आहे. 

* सरकारी रुग्णालयांमधील प्रसुतीचे प्रमाण हे जवळपास तिप्पट झाले असून २००५ मध्ये ते १८% होते ते २०१६ मध्ये ५२ वर गेले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.