शुक्रवार, १ जून, २०१८

डेन्मार्कमध्ये बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी - १ जून २०१८

डेन्मार्कमध्ये बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी - १ जून २०१८

* अन्य युरोपियन देशाप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे.

* मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.  असा कायदा करण्याची आवश्यकता नव्हती असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

* डेन्मार्कच्या संसदेत गुरुवारी बुरखा आणि निकाब बंदीचे विधेयक ७५ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्याचा आपला हेतू नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

* डोक्याला बांधायचा स्कार्फ, पगडी, आणि पारंपरिक ज्यू टोपीवर बंदी घालण्यात आलेली नाही. डेन्मार्कमध्ये काही मुस्लिम महिला संपूर्ण शरीर आणि चेहरा झाकणारी वस्त्रे परिधान करत होती.

* या निर्णयामुळे यापुढे डेन्मार्कमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा आणि निकाब परिधान करता येणार नाही. येत्या १ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करायची ते पोलिसांवर अवलंबून आहे.

* या कायद्यानुसार योग्य कारण असेल तर लोकांना त्यांचा चेहरा झाकता येईल. नियमांचे उल्लंघन करणार्यांना १ हजार क्रोनर डेन्मार्क चलन दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना पकडले तर १० हजार क्रोनरचा दंड किंवा ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.